
खरा पठाण ‘विरुद्ध’ फिल्मी पठाण सामना रंगणार.
रशीद खान पठाण यांनी दाखल केली याचिका.
सीबीआय च्याच पुराव्यांच्या आधारे शाहरुख खान ने मुलगा आर्यन खान याला ड्रग्स बाळगल्याच्या केसमधून वाचविण्यासाठी नारकोटिक्स विभागाच्या अधिकाऱ्यांना १८ कोटी रुपये लाच कबूल करून 50 लाख रुपये लाच दिल्याचे सिद्ध झाले असल्याचे नमूद आहे.
NCB च्या चौकशी अहवालावरुन सीबीआय कडून नोंद एफ. आय. आर. मध्ये शाहरुख खान कडून NCB चे संचालक समीर वानखेडे यांना के.पी.गोसावी मार्फत लाच दिल्याचे सिद्ध.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा चे कलम 12 नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (ACB) ला न कळविता अधिकाऱ्यांना परस्पर लाच देणारा व्यक्ती सुद्धा पाच वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र आहे.
शाहरुख खान, समीर वानखेडे व नाऱ्कोटिक्स च्या अधिकाऱ्यांची नाऱ्को चाचणी, ब्रेन मॅपिंग व लाय डिटेक्टर चाचणी इत्यादी चाचण्या करण्याचे सीबीआय ला निर्देश देण्याची मांगणी.
याचिकाकर्ता तर्फे अँड. निलेश ओझा यांच्यासह अँड तनवीर निजाम, अँड. ईश्वरलाल अग्रवाल, अँड. आनंद जोंधळे इत्यादी नामवंत वकील बाजू मांडणार आहेत.
मुंबई : याबाबत सविस्तव वृत्त असे आहे की, दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई नार्कोटेक्स विभागाचे एनसीबी चे संचालक समीर वानखेडे यांनी शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला प्रतिबंधित ड्रग्स बाळगल्या प्रकरणी अटक केली होती.
त्या प्रकरणात नंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर एनसीबी विभागाने विशेष तपास समिती (Special Enquiry Commission) ची स्थापना केली त्या समितीने दिलेल्या अहवालानुसार समीर वानखेडे यांचे निकटस्थ किरण पी. गोसावी यांच्यामार्फत शाहरुख खान ने बोलणे करून त्याच्या मुलाला आर्यनला वाचवण्यासाठी 25 कोटी एवजी 18 कोटी रुपये लाच देण्याचे कबूल केले तसेच त्याच्या बोलण्यानुसार शाहरुख खान ने पन्नास लाख रुपये लाच किरण गोसावी ला पोहोचवली.
त्यापुराव्याच्या आधारे रशीद खान पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय ने नोंद केलेल्या FIR मध्ये शाहरुख व आर्यन खान यांना आरोपी बनवून त्या दोघांची व नार्कोटिक्स विभागाचे समीर वानखेडे व इतर यांची नार्को चाचणी ब्रेन मॅपिंग टेस्ट व लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
तसेच या प्रकरणात शाहरुख खान व आर्यन याला वाचविण्यासाठी पदाचा दुरुपयोग करून खोटे पुरावे रचणारे दोषी तपास अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा भा.द.वी. १६६, २१८, २०१, ४०९ ,४७१, ४७४, १९२, १९३, १२०(B), ३४ आदी कलमाअंतर्गत कारवाई चे निर्देश सीबीआय ला देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.