STAY UPDATED WITH SC NEWS
शाहरुख खान प्रकरणात रशीद खान यांच्या याचिकेनंतर सी.बी.आय. ला आली जाग .
शाहरुख खान, त्याचा मुलगा आर्यन व शाहरुखची सेक्रेटरी पूजा दादलाणीला तपासासाठी बोलाविण्याची कारवाई सुरु. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती.
तिघांनाही होवू शकते अटक.
मुंबई: ड्रग्स बाळगल्याच्या प्रकरणात अटक झालेल्या आर्यन खान ला केस मधून वाचविण्यासाठी 18 कोटी रुपये लाचेची रक्कम ठरवून 50 लाख रुपये दिल्याप्रकरणात सीबीआय ने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध FIR दाखल केला होता परंतू लाच देणारे शाहरुख खान व इतर दोन यांना आरोपी करण्यात आले नव्हते .
त्यांना आरोपी बनविण्याकरीता रशीद खान पठाण यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
त्यामुळे सीबीआय जागी झाली असून सीबीआय अधिकाऱ्यांनी शाहरुख खान , आर्यन खान व शाहरुखची खाजगी सचिव पूजा दादलानीला चौकशीसाठी बोलवणार असल्याचे आज जाहीर केले आहे. चौकशीत सीबीआय कडून शाहरुख खान व इतर दोन यांना अटक होवू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाच देवून सरकारी अधिकाऱ्याकडून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून घेवून स्वतःच्या मुलाला वाचविण्यासाठी केलेल्या गैरकृत्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम चे कलम १२ मध्ये ५ वर्षे कारावासाची तरतूद आहे.
तसेच भादंवि 109, 409, 102(B), 34 नुसार आरोपीना आजीवन कारावासाची शिक्षा होवू शकते .