[संजय राऊत] सर्व न्यायाधीशांना भ्रष्ट आणि न्यायालयांना सुलभ शौचालय म्हणणे भोवले.
बेताल आरोप करणारे संजय राऊत , उद्धव ठाकरे विरुद्ध न्यायधीश व वकिल संघटनांचा संताप.
कोर्ट अवमानना आणि फौजदारी कारवाईसाठी इंडियन बार एसोसिएशनतर्फे मुख्य न्यायमूर्तीकडे तक्रार दाखल.
संजय राऊत यांच्या बेताल आरोपामुळे त्यांचाच जामीन रद्द होण्याची शक्यता कारण त्यांनी भ्रष्टाचाराने जामीन मिळविला असे दिसत असल्याचा निष्कर्ष.
संजय राऊतांवर कारवाई न झाल्यास वकील संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचा ईशारा.
मुख्य न्यायमूर्तीकडून उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरुद्ध कारवाईस विलंबामुळे न्यायाधीश व वकील संतप्त.
मुंबई :- महाराष्ट्रातील न्यायालयाचे भ्रष्ट झाली आहेत न्यायालयात फक्त भ्रष्टाचारच चालतो, मेरीट वर निर्णय होत नाही. न्यायालयाचे सुलभ शौचालय झाले आहे. सत्र न्यायाधीश जामीन देतांना लाच घेण्यासाठी लांबच्या तारखा देतात असे आरोप करून असलेला लेख सामना मध्ये प्रकाशीत करून ईमानदार व कर्तव्यनिष्ठ न्यायाधीशांचा आणी संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याप्रकरणी सामनाचे संजय राऊत संपादक उद्धव ठाकरे आदींविरुद्ध कारवाईसाठी ‘ इंडियन बार असोसिएशनचे’ राष्ट्रीय अध्यक्ष श्री एड. निलेश ओझा यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्याकडे तक्रार दाखल करून आरोपींविरुद्ध कोट अवमानना व इतर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे .
तक्रारींमधील मागण्या खालीलप्रमाणे आहेत :
(i) राज्यातील सरसकट सर्व न्यायाधिशांना भ्रष्ट व विकाऊ म्हणून आणि सर्व न्यायालयांना सुलभ शौचालय संबोधून व तसा लेख दैनिक सामनामध्ये प्रकाशित करून राज्यातील सर्व इमानदार व कर्तव्यनिष्ठ न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेची घोर अवमानना चौथ्यांदा केल्याप्रकरणी दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, संपादक उद्धव ठाकरे व मुद्रक प्रकाशक विवेक कदम यांच्याविरुद्ध कोर्ट अवमानना कायदा १९७१ चे कलम २(c), १२ अंतर्गत त्वरित कारवाई करणेबाबत.
(ii) संजय राऊत यांनी सर्व सत्र न्यायाधीश भ्रष्टाचारी असून आर्थिक व्यवहार करतात असे आरोप केल्यामुळे संजय राऊत यांनी सत्र न्यायाधीशांकडून जामीन घेतांना गैरव्यवहार केला असल्याचे दिसत असल्यामुळे त्या आरोपाबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देऊन संजय राऊत यांची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि जर आरोप खरे आढळल्यास संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा व दोषी जजवर कारवाई करण्यात यावी आणि जर आरोप खोटे निघाले तर खोटे आरोप केल्याप्रकरणी संजय राऊत, उद्धव ठाकरे व इतर यांच्याविरुद्ध भादवी १२० (B), ४६९, १९२, १९३, १२०(B), १०९, ३४, इत्यादी कलमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे.
(iii) आरोपी व त्याचे परिवारातील सदस्य हे जनतेच्या कोट्यावधी रुपयांचा अपहार, फसवणूक, सामूहिक बलात्कार, हत्या, ड्रग्स स्मगलिंग, पत्रा चाळ, खिचडी चोरी घोटाळा, कोव्हीड सेंटर घोटाळा, अवैध मास्क दंड खंडणी वसुली, लॉकडाऊन घोटाळा अश्या विविध गंभीर फौजदारी गुन्ह्यांमध्ये आरोपी असून त्यांना अटक होण्याची शक्यता असल्यामुळे न्यायालयांवर दबाव निर्माण होऊन त्यांना जामीन मिळण्यास मदत व्हावी किंवा जामीन न मिळाल्यास जनतेची सहानुभूती मिळावी या दुष्ट हेतूने सदरील लेख लिहला असल्यामुळे राज्यातील कोणत्याही न्यायधीशांनी अश्या दबावतंत्राला बळी पडू नये असे निर्देश देणेबाबत.
(iv) आरोपी संजय राऊत हा ईडी ने दाखल गुन्ह्यामध्ये जामिनावर असतांना असे गुन्हे वारंवार करीत असल्यामुळे त्याचा जमीन रद्द करण्याची प्रक्रिया सरकारी वकिलांनी / ईडी ने सुरु करावी असे निर्देश राज्याचे महाधिवक्ता (ऍडव्होकेट जनरल) यांना देणेबाबत.
सदर आरोपांमुळे ईमानदार व कर्तव्यनिष्ठ न्यायधीश, न्यायालयीन कर्मचारी व वकिलांमध्ये संतापाची भावना असून आरोपींविरुद्ध लवकर कारवाई न केल्यास त्या संतापाचे परिणाम लवकरच दिसतील अशी माहिती ‘इंडियन बार एसोसिएशनचे’ राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. निलेश ओझा यांनी दिली.
संजय राऊत यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्यांनी सत्र न्यायालयाकडून जो जमीन मिळविला आहे तो लाच देवून, भ्रष्टाचारानेच मिळविलेला असल्यामुळे तो जामीन त्वरीत रद्द करण्यात यावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.