दिशा सालियन हत्या प्रकरणात जनतेला मूर्ख बनविण्यासाठी आदित्यच्या बाजूने खोटी बातमी बनविणारे लोकमत न्यूज – 18 चे आशिष जाधव यांचा बोगसपणा उघड. जनतेला मूर्ख समजणारे विकाऊ पत्रकार उघडे पडले.
मुंबई:- दिशा सालियन सामुहिक अत्याचार व हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सरकारने ‘विशेष तपास पथक’ ‘SIT’ च्या नावाची घोषणा करणार असल्याबाबत माहिती दिल्यानंतर काही विकाऊ पत्रकारांनी आरोपींची प्रतिमा जनमाणसात सुधारण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोट्या, बनावट व बोगस बातम्या पसरविणारे लोकमत न्यूज–18 चे आशिष जाधव यांचा बोगसपणा उघडकीस आणणारे पुरावे याचिकाकर्त्या तर्फे देण्यात येत आहे.
लोकमत न्यूज-18 ने दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी ‘Disha Salian’ प्रकरणाची SIT चौकशी, कुणाच्या अडचणी वाढणार? Aditya Thackrey‘ या मथळ्याखाली एक १३ मिनीटाचा कार्यक्रम प्रसारित केला.
लिंक: https://www.youtube.com/watch?v=EwNUOeEo09o&ab_channel=LOKMAT
त्या प्रसारणामध्ये आशिष जाधव यांनी काही खोट्या बाबी सांगितल्या असून आशिष जाधवांचा खोटेपणा उघडकीस आणणारे पुरावे खालील प्रमाणे आहेत.
(१) (3:40 आणि 8:55) या वेळेत आशिष जाधव यांनी असे खोटे सांगितले कि मुंबई उच्च न्यायालयाने आदित्य ठाकरे यांच्याविरुद्धची याचिका सुनावणीसाठी घेतलेलीच नाही.
आशिष जाधवांचा खोटेपणा हा मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. ६ डिसेंबर च्या मुख्य न्यायमुर्तीपुढे असलेल्या बोर्ड वरून सिध्द झाला आहे.
आदित्य ठाकरे विरुद्धची जनहित याचिका (PIL) १७९८३ ऑफ २०२३ ही दि. ६ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी २७ क्रमांकावर होती व वेळेच्या अभावामुळे तिची सुनावणी 17 जानेवरी 2024 रोजी घेण्याच्या आदेश ६ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने पारित केले आहेत.
आदेशाची प्रत: http://bit.ly/4adJ7KA
(२) आशिष जाधवांनी ६:४५ या वेळेत असे खोटे सांगितले की दिशा सालियनचा मृत्यू १४ व्या मजल्यावरून पडून झाला असा केसचा क्लोजर रिपोर्ट मुंबई पोलिसांनी दिला व तो रिपोर्ट उच्च न्यायालयाने मंजुरही केला (त्या रिपोर्टवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
आशिष जाधवांचा खोटेपणा स्पष्ट आहे कारण उच्च न्यायालयाने दिशा सालियनचा कोणताही क्लोजर रिपोर्ट मंजूर केलेला नाही. असे कोणतेही आदेश नाहीत. आशिष जाधवांना ओपन चॅलेंज, खुले आवाहन आहे की त्यांनी म्हटलेले उच्च न्यायालयाचे आदेश सादर करावेत. अन्यथा त्यांच्याविरुद्ध कोर्ट अवमाननाची कारवाई करण्यात येईल.
(३) वेळ ९:३५ च्या पुढे आशिष जाधवांनी असे म्हटले की दिशा सालियनचे आईवडील म्हणत आहेत की त्यांच्या मुलीची आत्महत्या आहे व मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट देऊनही जर SIT नेमून ती फाइल ओपन करत असेल तर हे राजकारण नाही तर काय याची चर्चा होणार आहे.
याचा खोटेपणा हा दिशा सालियनचे वडील यांनी नुकतेच R- Bharat न्युज चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीवरून सिद्ध होतो. तिथे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की प्रकरणात तपास होवुन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.
Title: – Disha Salian’s father speaks to Republic, demands action against accused
Link: – https://www.youtube.com/watch?v=tAIzDIqpb3I&ab_channel=RepublicWorld
तसेच टाइम्स ऑफ इंडिया ला दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी हीच गोष्ट सांगितली आहे.
Title:- ‘Disha Salian’s father claims his daughter was murdered’
परंतु वरील सर्व बाबी लपवून लोकमत News-18 व आशिष जाधव यांनी खोट्या बातम्या प्रकाशित करून जनतेची दिशाभूल चालविली आहे.