
STAY UPDATED WITH SC NEWS
मुंबई | ११ जुलै २०२५
स्व. दिशा साळियन यांच्या वडील श्री. सतीश साळियन यांच्यावतीने पाठवण्यात आलेल्या ₹1 लाख कोटींच्या मानहानीच्या कायदेशीर नोटिसला उत्तर देण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया च्या वतीने २ आठवड्यांची मुदत मागण्यात आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाचे वकील अधिवक्ता विजय हिरेमठ यांनी ही मुदतवाढ मागितली असून, त्यांनी हे प्रतिनिधित्व Bennett Coleman & Co. Ltd., संचालक विनीत जैन, रिपोर्टर रॉझी सेक्वेरा, संपादक डेरेक डिसोझा, तसेच Economic Times चे संबंधित पत्रकार व संपादक यांच्यावतीने केले आहे.
पाठवलेल्या नोटीसमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित पत्रकारांनी दिशा साळियन प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही जाणीवपूर्वक एकतर्फी, अपूर्ण, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या. या कथित वृत्तांचे उद्दिष्ट केवळ आरोपी व्यक्तींची प्रतिमा उजळवणे इतकेच मर्यादित नव्हते, तर श्री. सतीश साळियन, श्री. राशिद खान पठाण आणि श्री. मुरसलीन शेख या न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची सार्वजनिक, सामाजिक आणि कायदेशीर प्रतिमा कलंकित करण्याचा सुनियोजित प्रयत्न त्यामागे होता. या प्रकारामुळे ना केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा अपमान झाला, तर न्यायप्रक्रियेवरही प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.