[बिग ब्रेकिंग] सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टचे निवृत्त्त न्यायधीश दीपक गुप्ता, रोहिंटन नरीमन, एस. जे. काथावाला विरुद्ध पोलिसांच्या भ्रष्टाचार प्रतीबंधक विभागातर्फे चौकशी सुरु.
राष्ट्र्पतीं कार्यालयांच्या आदेशानुसार कारवाई.
आरोपी न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे दस्तावेज चोरी करून तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नावाने खोटे रिकॉर्ड तयार केल्याचे सरन्यायाधीश कार्यालयाने दिलेल्या पुराव्यावरून उघड.
आरोपीं न्यायाधीशांतर्फे त्यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेण्याकरीता फिर्यादीला दिले कोटयावधी रुपयांचे आमिष.
फिर्यादीने पोलिसांना सादर केले पुरावे.
आरोपी न्यायाधीशांनी केलेले गंभीर गुन्हे हे गंभीर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असून त्यांना भादंवि ४०९ नुसार आजीवन आजीवन कारावासाची शिक्षा होवू शकते.
आरोपी न्यायाधीश दीपक गुप्ता व रोहिंटन नरीमन चे वडील अॅड. फली नरीमन कडून भारतीय सैन्याचे मनोबल खच्चीकरण करून पाकिस्तानी सैन्याला समर्थन देणाऱ्या लोकांना मदत म्हणून केलेल्या देशद्रोही कृत्यांचे पुरावे सरकारला सादर.
आरोपी न्यायाधीशांना त्वरीत अटक करण्याची ‘सुप्रीम कोर्ट लॉयर्स असोसिएशन’, ‘इंडियन बार असोसिएशन’ व इतर वकील आणि सामाजिक संघटनांची मागणी.
मुंबईचे वकील अॅड. मिलिंद साठे व कैवान कल्याणीवाला सहआरोपी.
याआधी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शमीत मुखर्जी यांना सीबीआय ने अटक केली होती व न्या. निर्मल यादव, न्या. शुक्ला आदी अनेक न्यायाधीशांविरुद्ध सीबीआय ने आरोपपत्र दाखल केले आहे.
मुंबई: विशेष संवाददाता:- न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार करून खोटे पुरावे रचणे व सुप्रीम कोर्टाचे रिकॉर्ड चोरी करून सरन्यायाधीशांच्या नावावर खोटे दस्तावेज तयार करणारे व भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर प्रकरण दाबण्यासाठी फिर्यादीला कोट्यावधी रुपयांचे आमिष देणारे सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश रोहिंटन नरिमण, दीपक गुप्ता, विनीत सरण व मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. जे. काथावाला यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांच्या लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने तपास सुरु केला असून त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
सदर गुन्ह्यामध्ये मुंबईचे दोन वकील मिलिंद साठे व कैवाण कल्याणीवाला हे सुद्धा सहआरोपी आहेत.
‘सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिजन्ट असोसिएशनचे’ अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवर राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रोहिंटन नरिमण व विनीत सरण यांच्या खंडपीठाने बेकायदेशीर आदेश देऊन केलेल्या भ्रष्टाचारा संबंधी रशीद खान पठाण व इंडियन बार अससोसिएशन महाराष्ट्र अँड गोवा चे अध्यक्ष ॲड. विजय कुर्ले यांनी राष्ट्रपतींकडे रीतसर लेखी तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती.
त्या तक्रारीमध्ये कारवाई होईल या भीतीने आरोपी न्यायाधिशांनी कट रचून सह आरोपी ॲड. मिलिंद साठे व कैवान कल्याणीवाला यांच्या सहीचे एक पत्र दि. २३.०३.२०१९ रोजी सरन्यायाधीश यांच्याकडे पाठविले. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी २५.०३.२०१९ रोजी ते पत्र कारवाई योग्य नसल्याचे नमूद करून फाईल बंद करण्याचे आदेश दिले.
असे असतांना आरोपी न्यायाधीश रोहिंटन नरिमण, दीपक गुप्ता यांनी संबंधित रिकॉर्ड गायब करून असे खोटे रिकॉर्ड तयार केले कि सरन्यायाधीश श्री. रंजन गोगोई यांनीच त्यांना ते पत्र पाठवून तक्रारकर्ते वकील ॲड. विजय कुर्ले, रशीद खान पठाण व ॲड. निलेश ओझा विरुद्ध कोर्ट अवमानांची कारवाई करण्यास आहे.
आरोपी न्यायाधीशांनी स्वतःला वाचविण्यासाठी खोटे पुरावे रचून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाविरुद्ध जावून ॲड. विजय कुर्ले व इतर यांना कोर्ट अवमानना अंतर्गत शिक्षा सुनावली. त्या शिक्षेविरुद्ध ॲड. विजय कुर्ले व इतर यांनी रिट पिटिशन दाखल केले.
त्या याचेकेमध्ये वरिष्ठ खडपीठाने ॲड. विजय कुर्ले, ॲड. निलेश ओझा व रशीद खान पठाण यांच्याविरुद्धच्या शिक्षेला स्थगिती दिली.
रशीद खान पठाण यांनी सरन्यायाधीश कार्यालयाकडून सर्व पुरावे लेखी स्वरूपात प्राप्त करून घेतले. त्या पुराव्यावरून आरोपी न्यायाधीशांनी सरन्यायाधीश यांच्या नावावर खोटे पुरावे रचून खोटे रिकॉर्ड तयार करून खरे रिकॉर्ड चोरल्याचे सिद्ध झाले.
आरोपी न्यायाधीशांनी केलेले गंभीर गुन्हे हे गंभीर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असून त्यांना भादंवि ४०९ नुसार आजीवन आजीवन कारावासाची शिक्षा होवू शकते.
फिर्यादीने आरोपी न्यायाधीशांविरुद्ध भादवी १६६, २०१, २०२, २१८, २१९, २२०, ४०९, ४६५, ४६६, ४७१, १२०(B), ३४ आदी कलमाअंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.
त्या तक्रारीची माहिती मिळताच आरोपी न्यायाधीशांनी दोन लोकांना फिर्यादीकडे पाठवून तडजोड करण्याची व तक्रार मागे घेण्याची विनंती केली व त्याकरिता ४०० कोटीपर्यंत रक्कम देण्याचे आमिष दिले.
फिर्यादीने त्यांची ऑफर धुडकावून लावून त्याबाबत राष्ट्रपती व सीबीआय कडे रीतसर तक्रार दाखल केली.
राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास सुरु केला व फिर्यादीला ६ जुलै २०२३ रोजी ‘सूचना पत्र’ पाठवून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व पुरावे व दस्तावेज सादर कार्यास सांगितले.
फिर्यादी रशीद खान पठाण यांनी ७ जुलै रोजी सर्व पुरावे पोलिसांना सादर करून त्यांचा जबाब नोंदविला आहे.
आरोपी न्यायाधीशांचे भ्रष्टाचार व इतर गंभीर गुन्हे उघडकीस आणणारे सर्व कागदोपत्री पुरावे, व्हीडीओ रेकॉर्डिंग, स्टिंग ऑपेरेशन हे फिर्यादीकडे उपलब्ध आहोत.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी न्यायाधीशांना त्वरित अटक करावी अशी मागणी ‘सुप्रिम कोर्ट लॉयर्स अससोसिएशन’ चे अध्यक्ष ॲड. ईश्वरलाल अगरवाल यांनी केली असून अशीच मागणी ‘इंडियन बार अससोसिएशन’ व इतर सामाजिक व नागरिक मानवी हक्क संघटनांनी केली आहे.
आरोपी न्यायाधीश दीपक गुप्ता, रोहिंटन नरिमन यांचे वडील ॲड. फली नरिमण यांच्या देशद्रोही कारवायांचे पुरावेही पोलिसांना आधीच देण्यात आले आहेत.