काँग्रेसकडून संविधानाचा अपमान करून मानहानी करण्यात आल्यामुळे राहुल गांधी, काँग्रेस पार्टी व वरिष्ठ नेत्यांना 100 कोटीची मानहानीची नोटीस जारी.
पतंप्रधान मोदींच्या जवळचे सर्व लोक हे एक नंबरचे गुन्हेगार असल्याचा व भाजपामध्ये एकापेक्षा एक मोठे गुन्हेगार भरले असल्याचा विडिओ प्रकाशीत करणे काँग्रेसला महागात पडले.
कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरविल्याशिवाय त्याला गुन्हेगार मानता येणार नाही अश्या संविधानातील तरतुदीचे व त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काँग्रेसने उल्लंघन केल्याचे स्पष्ट.
देशभरातून अनगिणत केसेस दाखल होणार असल्याची माहिती.
‘सुप्रीम कोर्ट ऍण्ड हाय कोर्ट लिटीजन्ट्स एसोसिएशन’ चे अध्यक्ष रशीद खान पठाण यांच्या वतीने ॲड. ईश्वरलाल अगरवाल यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
आरोपींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कोर्ट अवमाननाची याचिका लवकरच दाखल करण्यात येणार असून मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात भादंवि ५००, ५०१, १२०(बी), ३४, १०७ अंतर्गत फौजदारी केस दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती ॲड. ईश्वरलाल अगरवाल यांनी दिली.
राहुल गांधीना या आधीच “मोदी चोर है, ऐसा सुप्रीम कोर्ट ने बोला है” अशी खोटी विधाने केल्यामुळे 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोर्ट अवमानना प्रकरणात दोषी ठरवून सक्त ताकीद दिली होती की, त्यांनी अशी खोटी व बदनामीकारक विधाने करू नये व यापुढे जबाबदारीने वागावे. [Yashwant Sinha v. CBI, (2019) 6 SCC 1]
तसेच 2023 मध्ये मोदी नावाचे सगळेच लोक चोर असतात असे विधान केल्यामुळे राहुल गांधी यांना गुजरातच्या प्रथम श्रेणी न्यायाधीश यांनी 2 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती आणी त्या शिक्षेला स्थगीती देतांना 2023 मध्ये सर्वाच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना पुन्हा फटकारले होते व यापुढे जबाबदारीने वागण्याची ताकीद दिली होती. [ Rahul Gandhi v. Purnesh Ishwarbhai Modi, (2024) 2 SCC 595]
वरील नोटीस शिवाय इतरही अनेक पक्षकारांकडून आरोपींना नोटीसेस पाठविण्यात येणार आहेत.
सदरील नोटीसेस ह्या दोन सामाजिक कार्यकर्ते व एक भाजपा सदस्य यांच्यावतीने ॲड. ईश्वरलाल अगरवाल, ॲड. तनवीर निझाम व ॲड. निलेश ओझा यांच्यामार्फत पाठविण्यात येणार आहेत.
काँग्रेसच्या त्या विधानामुळे भाजप व नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधित सर्वच लोकांची बदनामी झाली असून भाजपमधील ज्या लोकांच्या केसेस न्यायालयात प्रलंबित आहेत त्या सर्वांच्या मूलभूत संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन झाले असल्यामुळे सर्वांकडून लवकरच केसेस दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : विशेष संवाददाता : काँग्रेस पक्षाच्या अधिकृत Whatsapp चॅनलवर दि. १५.०६.२०२४ रोजी एक ३४ सेकंदाचा व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला आहे. व त्याखाली ‘नरेंद्र मोदी का वही खास, जो हो एक नंबर का बदमाश’ अशी टॅग लाईन लिहण्यात आली.
तसेच त्या विडिओ मध्ये असेही सांगण्यात आले की, “भाजपा मध्ये एकापेक्षा एक सरस गुन्हेगार आहेत व अनेकांच्या विरुद्ध केसेस प्रलंबित आहेत.”
वरील विधानामुळे जे जे लोक भाजपा आणी श्री. नरेंद मोदी यांच्या जवळचे आहेत किंवा प्रत्यक्ष अप्रत्येक्षरीत्या जुळलेले आहेत त्या सर्वांची बदनामी/ मानहानी झाली आहे व तो व्हिडीओ अजूनही उपलब्ध असल्यामुळे आजही सुरु असल्यामुळे संपूर्ण काँग्रेस पक्ष व त्याचे महत्वपूर्ण नेते श्रीमती सोनिया गांधी, श्री. राहुल गांधी, श्रीमती सुप्रिया श्रीनेत, श्री. मल्लिकार्जुन खडगे, श्री. जयराम रमेश, श्री. पी. चिदंबरम, इत्यादींना 100 कोटी रुपये नुकसान भरपाईची नोटिस बजावण्यात आली असून लवकरच त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दिवाणी व फौजदारी केसेस आणि सर्वोच्च न्यायालयात कोर्ट अवमानना अंतर्गत याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वकिल ॲड. ईश्वरलाल अगरवाल यांनी दिली.
श्री. रशीद खान पठाण हे ‘इंडियन बार एसोसिएशन’ च्या प्रकाशन विभागाचे प्रमुख असून IBA तर्फे ॲड. निलेश ओझा द्वारा लिखीत पुस्तकांची प्रशंसा अनेक मान्यवरांनी केली आहे. त्यामध्ये सरन्यायाधीशांसह उपराष्ट्र्पती व इतर अनेक मान्यवर यांचा समावेश आहे. त्याच पुस्तकांची प्रशंसा करतांना प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी व गृहमंत्री व तत्कालीन भाजपा अध्यक्ष श्री. अमित शाह यांनीही लेखी पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. या कारणास्तव काँग्रेसच्या त्या वादग्रस्त पोस्टमुळे श्री. रशीद खान यांची बदनामी झाली आहे असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
नोटीसमध्ये काँग्रेस पक्षावर डबल स्टँडर्ड (दुटप्पीपणा) करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कारण काँग्रेस पक्षाचे जवळचे नेते व ज्यांच्यासोबत काँग्रेसने निवडणुकीत युती केली होती ते आदित्य उद्धव ठाकरे यांचे मोबाईल टॉवर लोकेशन हे जिथे दिशा सालियन हिच्यावर सामूहिक अत्याचार झाला व तिचा खून झाला त्या ठिकाणी आढळून आले असून त्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी घेतलेला बचाव हा सुद्धा खोटा असल्याचे सिद्धझाले आहे.
तसेच आदित्य ठाकरेंचे यांचा संबंध सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्याप्रकरणातही जोडला गेला असतांना काँग्रेसने त्या संदर्भात मौन बाळगले तसेच ड्रग स्मगलिंग चे आरोपी डिनो मोरया यांचा आदित्य ठाकरेंशी संबंध व त्यांची नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमातील उपस्थिती याबाबत काँग्रेसने मौन बाळगल्याप्रकरणी काँग्रेसच्या दुटप्पीपणाचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.