
STAY UPDATED WITH SC NEWS
नागपूर | ११ जुलै २०२५
स्व. दिशा साळियन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाशी संबंधित ₹९०० कोटींच्या मानहानी खटल्यात आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. Live Law या नामांकित ऑनलाइन माध्यम संस्थेने नागपूर येथील सिव्हिल न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या समोर लिखितरित्या कबूल केले की, त्यांनी सतीश साळियन यांच्या वकिलांविरोधात प्रकाशित केलेली वादग्रस्त बातमी हटवली आहे.
सदर बातमीवर आरोप होता की ती खोटी, अपूर्ण व दिशाभूल करणारी असून तिच्या माध्यमातून वकिलांची प्रतिमा मलिन करण्याचा, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
अधिवक्ता पार्थ सारथी सरकार, जे श्री. सतीश साळियन यांचे प्रतिनिधित्व करतात, यांनी दावा केला की Live Law ने जाणीवपूर्वक खोटे वृत्त प्रसारित करून लोकांमध्ये गैरसमज आणि दिशाभूल निर्माण केली, आणि त्यामुळे प्रकरणाचा हेतुपुरस्सर विपर्यास करण्यात आला.
याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे की, Live Law च्या संबंधित वार्ताहर, संपादक व संचालकांची संपत्ती तत्काळ जप्त करण्यात यावी, तसेच ₹९०० कोटी रुपयांची बँक गॅरंटी भरल्याशिवाय त्यांना नागपूर सिव्हिल तुरुंगात ठेवण्याचे आदेश द्यावेत.
आजची सुनावणी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पार पडली.
खोट्या प्रचाराला जबर धक्का
Live Law कडून लेख हटवल्याची कबुली ही त्या पत्रकार व माध्यमांसाठी मोठा धक्का मानली जात आहे, जे आरोपी आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतरांची प्रतिमा उजळवण्यासाठी योजनाबद्धपणे खोटे कथानक व अपप्रचार रचत होते, आणि दुसरीकडे श्री. सतीश साळियन यांना राजकीय हेतूंनी प्रेरित म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते.
या पार्श्वभूमीवर पुढील सुनावणी 29 जुलै 2025 रोजी निश्चित करण्यात आली आहे, आणि त्या दिवशी न्यायालय निर्णायक आदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.