[बिग ब्रेकिंग] दिशा सालीयन बलात्कार, हत्या आणी सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणी अटकेच्या आदेशाच्या भीतीने आदित्य ठाकरेची उच्च न्यायालयात धाव.
आदेश देण्याआधी म्हणणे ऐकून घेण्याची विंनती.
आदित्य ठाकरे यांनी उच्च न्यायालयात खोटे शपथपत्र दिल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना त्वरित अटक करण्यासाठी उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल.
२० ऑक्टोबर रोजी सुनावणीची शक्यता.
आदित्य ठाकरेंवर लहान मुलांवर अत्याचार व ड्रग घेण्यासंबंधीचे इतर गंभीर आरोपांची चौकशीसाठी याचिका सूचिबद्ध आदित्य ठाकरे व त्यांचे वकील राहुल आरोटे यांच्याविरुद्धही न्यायालय अवमाननांच्या कारवाईची मागणी.
खोटे शपथपत्र दाखल केल्याप्रकणी आदित्य ठाकरेंवर १० कोटी रुपये दंड ठोठावण्याची मागणी.
मुंबई: – दिशा सालीयन यांचा ८ जून २०२० रोजी सामूहीक बलात्कार करून खून करण्यात आला होता व त्या प्रकरणाचे मुख्य आरोपी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि डिनो मोरया हे असल्याचे त्या तिघांच्या मोबाईल टॉवर लोकेशन व इतर पुराव्यावरून सिद्ध होवूनही पोलिसांकडून या तिघांनाही अटक करण्यात टाळाटाळ होत असल्यामुळे आरोपींना अटकेचे निर्देश पोलिसांना देण्याकरिता ‘Supreme Court and High Court Litigant Association‘ चे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी दिनांक 27 सेप्टेंबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालत एक जनहित याचिका दाखल केली आहे. [PIL No. 17983 of 2023]
त्या याचिकेमध्ये सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय कडूनही समाधानकारक योग्य तपास होत नसल्याने त्यांनाही योग्य ते निर्देश देण्याची मागणी कारण्यात आली आहे.
आरोपींना वाचविण्यासाठी व जनतेची दिशाभूल करण्यासाठी ती याचिका दाखल झाल्यांनतर आरोपींनी राजदीप सरदेसाई यांच्यामार्फत रिया चक्रवर्ती यांच्या मुलाखती दाखवून व दैनिक लोकमत मध्ये खोटी बातमी प्रकाशीत केल्यामुळे राजदीप सरदेसाई, रिया चक्रवर्ती व इतरांना सहआरोपी बनवून त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी नवीन अर्ज. [I.A. No. 18784 of 2023] हा दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला.
त्यांनतर उच्च न्यायालयाकडून अटकेचे आदेश पारीत होवून पुढील कारवाईच्या भीतीने आरोपी आदित्य ठाकरे यांनी त्या जनहित याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करून आदेश पारीत करण्याआधी न्यायालयाने त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यावी अशी विनंती केली आहे. [I.A. No.19336 of 2023]
त्या अर्जामध्ये आदित्य ठाकरेने असा प्रमुख खोटा बचाव घेतला की, दिशा सालियन व सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास पोलीस व सीबीआय कडून आधीच पूर्ण झाला असून आरोपी (आदित्य ठाकरेचा) गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. सदरची याचिका हि नारायण राणे, नितेश राणे व अर्णब गोस्वामी यांच्या खोट्या आरोपांवर आधारित आहे तसेच सरकारला राजकीय लाभ पोहचविण्यासाठी आणि आरोपीला ब्लँकमेल करण्यासाठी दाखल केली आहे.
आदित्य ठाकरे यांचे शपथपत्र हे खोटे असल्याचे सीबीआय व पोलीस रिकॉर्ड वरून सिद्ध झाले असून सीबीआयने आधीच स्पष्ट केले आहे की दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना कोणतीही क्लीन चीट दिली नसून तशी खोटी बातमी आरोपींकडून प्रकाशित करण्यात आली होती. तसेच राज्य सरकारने दिशा सालियन प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ची नेमणूक केली असून त्यांचा तपास सुरु आहे.
तसेच सीबीआय ने खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना लिहलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की , सीबीआय ने सुशांत सिंग राजपूतच्या खुनाची व इतर गंभीर आरोपांची शक्यता नाकारली नसून सुशांत सिंगने आत्महत्याच केली असल्याचा कोणताही निष्कर्ष सीबीआय ने काढलेला नाही.
यावरून आदित्य ठाकरे यांचे शपथपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्यामुळे आदित्य ठाकरेंविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 340 नुसार कारवाई करून त्यांना अटक करून भादंवि 191, 192, 193, 199, 200, 201, 466, 471, 474, 120(B), 34, 109 आदी कलमांतर्गत केस दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांना देण्यात यावी अशी मांगणी करण्यात आली आहे .
सदर गुन्ह्यांमध्ये आदित्य ठाकरेंचे इतर बचावसुद्धा खोटे असल्याचे आधीच सिद्ध झाले असून त्याबाबतचे पुरावे याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात दाखल केले आहेत .
आदित्य ठाकरे यांनी दि. 23.12.2022 रोजी ABP माझा ला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले होते की 8 जून 2020 रोजी जेव्हा दिशा सालीयन हिचा खून झाला त्या दिवशी त्यांचे आजोबा श्री. पाटणकर यांचा देहांत झाला होता व त्यांना पाहण्याकरीता ते हॉस्पीटल मध्ये गेले होते
वरील बाब खोटी सिद्ध करणारे दोन स्पष्ट पुरावे उपलबध आहेत . एक म्हणजे आदित्य ठाकरेंचे आजोबा श्री. पाटणकर हे 8 जून 2020 रोजी जिवंत होता त्यांचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला होता .
दुसरा सर्वात महत्वपूर्ण पुरावा म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मोबाईल टॉवर लोकेशन नुसार 8 जून 2020 रोजी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली व डिनो मोरया हे तिघे दिशा सालियन हिच्या फ्लॅटवर उपस्थित होते. तसेच दिशा वर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांचे वडील व त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव आणून त्यांच्या मदतीने त्या आरोपींना वाचविण्यासाठी त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज हे गायब करण्यात आले होते व तत्कालीन तपास पोलीस आधिकाऱ्याने केसची फाईल हरविली असल्याची बतावणी बिहार पोलीस व सीबीआय कडे केली होती.
सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे सामूहिक बलात्काराचे पुरावे नष्ट करण्याकरीता दिशाचा मृतदेह हा पोस्ट मार्टमसाठी 3 दिवसांनी म्हणजेच 11 जून 2020 रोजी पाठविला होता.
त्या उलट सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम हे त्याच दिवशी करण्यात आले होते. यावरून आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांची व डॉक्टरांची मदत घेण्यात आली असल्याचे सिद्ध होते.
दुसरा खोटेपणा म्हणजे रिया चक्रवर्ती ने आपल्या मुलाखतीत असे म्हटले होते कि त्या आदित्य ठाकरेंना ओळखत नाही. परंतू बिहार पोलीस व खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या पुराव्यावरून आदित्य ठाकरे व रियामध्ये 44 पेक्षा जास्त वेळा मोबाईलवर संभाषण झाले असल्याचे सिद्ध होते.
सह आरोपी सुरज पांचोली ने सुद्धा दिशा सालियन ला ओळखत नसल्याची खोटी मुलाखत दिली होती.
याशिवाय मुंबई NCB विभागाने ड्रग्स प्रकरणात नोंद केलेला गुन्हा क्र. 15 of 2020 मध्ये सुद्धा रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे एका प्रॉपर्टी (मालमत्ते) संबंधीचे वाटसॲप चॅट सुद्धा उपलब्ध आहेत.
या सर्व पुराव्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गेम ओव्हर झाला असल्याची चर्चा असून खून व बलात्कारांच्या आरोपाशिवाय उच्च न्यायालयात खोटे शपथपत्र दाखल केल्याच्या गुन्ह्यात सुद्धा आदित्य ठाकरे तुरुंगात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.