[दिशा सालीयन व सुशांत सिंग राजपूत हत्या प्रकरण] आदित्य ठाकरेंना 19750 कोटी रुपयाची मानहानीची नोटीस.
याचिकाकर्ते रशीद खान पठाण यांनी पाठविली नोटीस.
उच्च न्यायालयातील शपथपत्रांमध्ये खोटे, बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत.
याचिकाकर्ते व साक्षीदारांकडून उत्तर प्रदेशात केस दाखल करण्याचे संकेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे, रिपब्लिकन टीवी चे अर्णब गोस्वामी , सुशांत सिंग राजपूत फॅन्स, प्रकरणातील साक्षिदार, तक्रारकर्ते आदी सर्वांकडून आदित्य ठाकरेंविरुद्ध देशभर केसेस दाखल होण्याची शक्यता.
याचिका कर्त्याकडून सर्व प्रसारमाध्यमांनांही न्यायप्रविष्ठ हत्येच्या प्रकरणाला आत्महत्या न संबोधण्याचे आवाहन.
मुंबई :- दिशा सालीयन व सुशांत सिंग राजपूत हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध सामुहिक बलात्कार आणी खुनाच्या गुन्ह्यातील सहभागाचे सबळ पुरावे उपलब्ध असूनही कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने आदित्य ठाकरे यांना अटक करण्याचे निर्देश पोलीसांना देण्यासाठी एक जनहीत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे . ती याचिका Supreme Court & High Court Litigants Association चे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी दाखल केली आहे . [ PIL ( St.) No. 17983 of 2023]
त्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून त्यांचे सुद्धा म्हणणे ऐकावे व त्यांना सुध्दा उत्तरवादी बनवावे अशी मागणी केली आहे. [I.A No 19336 of 2023]
आदित्य ठाकरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये याचिकाकर्ते रशीद खान पठाण यांच्यावर बदनामीकारक आरोप केले कि रशीद खान पठाण यांनी त्यांचा आर्थिक गैरफायदा करून घेण्याच्या उद्देशाने तसेच सरकारला फायदा पोहचविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. पुढे असेही आरोप करण्यात आले की ती याचिका दाखल करतांना रशीद खान यांनी त्यांच्या संघटनेच्या पदाचा दुरुपयोग केला आहे . याचिकेत नमूद प्रकरण हे व्यापक जनहिताचे नाही व त्याचा आणि Supreme Court & High Court Litigants Association संघटनेच्या उद्देशांचा काहीही संबंध नाही. दोन्ही प्रकरणात आधीच तपास होवून आदित्य ठाकरेंना दोषमुक्त करण्यात आले असतांनाही हि याचिका दाखल करून याचिकार्त्यांने गैरहेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. आदित्य ठाकरेंचे सदरचे आरोप हे खोटे, बिनबुडाचे व बदनामीकारक असल्यामुळे रशीद खान पठाण यांनी आदित्य ठाकरेंविरुद्ध उच्च न्यायालय कोर्ट अवमानना याचिका दाखल करून आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली. [I.A. No.19612 of 2023 ]
तसेच आदित्य ठाकरेंच्या खोट्या व बिनबुडाच्या आरोपांमुळे झालेल्या बदनामीप्रकरणी रशीद खान पठाण यांनी त्यांचे वकील श्री. चैतन्य रावते यांच्या मार्फत आदित्य ठाकरे यांना 19,750 कोटी रुपये नुकसान भरपाईची नोटीस पाठवून ठाकरेंनी सात दिवसाच्या आत सर्व वर्तमान पत्रात प्रथम पानावर पानभर आणी सर्व टीव्ही चॅनेलवर दोन मिनिटाचे माफीपत्र प्रकाशीत करून नुकसान भरपाई रक्कम 19,750 कोटी रुपये डीडीद्वारे द्यावेत अशी नोटिस दिली असून या नोटीसव्यतिरिक्त आदित्य ठाकरेंविरुद्ध भादंवि ५००, ५०१ अंतर्गत वेगळी केस उत्तर प्रदेश येथील न्यालयात व इतर देशातील इतर विविध न्यायालयात लवकरच दाखल करण्यात येत असल्याची माहिती रशीद खान पठाण यांचे वकील ॲड. निलेश ओझा यांनी दिली.
सदर प्रकरणात आदित्य ठाकरेने केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ नितेश राणे व रिपब्लिक भारतचे अर्णव गोस्वामी, प्रकरणातील साक्षीदार तक्रारकर्ते यांच्याविरुद्धही खोटे व बदनामीकारक आरोप केल्यामुळे त्यांच्याकरून अश्याच प्रकारची न्यायालयीन कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
प्रसारमाध्यमांना आवाहन:
सदर प्रकरणात उपलब्ध पुराव्यावरून सामूहिक बलात्कार व हत्या असे आरोप असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच सीबीआय ने सुद्धा ते प्रकरणात हत्या केलेल्या आरोपांची चौकशीही करत असल्याचे सीबीआय खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
दिशा सालियन प्रकरणातही हत्या, सामूहीक बलात्कार आदी आरोपांच्या चौकशी साठी विशेष तपास पथक (SIT) ची स्थापना करण्यात आली असून अजूनपर्यंत ते आरोप कायदेशीररीत्या खारीज झालेले नसल्यामुळे त्याला आत्महत्या संबोधणे म्हणजे न्यायालयाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप होतो. त्याबाबत स्पष्ट कायदा मुंबई उच्च न्यायालयाने Nilesh Navalakha v. Union of India, 2021 SCC OnLine Bom 56, प्रकरणात ठरवून दिला आहे. तरी प्रसारमाध्यमांनी याचे भान राखावे असे आवाहन याचिकाकर्ते रशीद खान पठाण यांचे वकील ॲड. निलेश ओझा यांनी केले आहे.