STAY UPDATED WITH SC NEWS
इंडियन बार असोसिएशन चे अॅड. ईश्वरलाल अगरवाल यांनी दाखल केली तक्रार.
आरोपींचा न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर विश्वास नसून आरोपीकडून नेहमीच कायदा हातात घेण्याची भाषा बोलणे व त्याचे समर्थन करण्याचे प्रकार घडत आसल्यामुळे आरोपींविरुद्ध योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या पक्षाची व दै. सामनाची मान्यता रदद करून त्यांना कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी.
तक्रारीतील मागणी खालीलप्रमाणे आहे:-
“११. विनंती. तरी आपणांस विनंती की;
(१) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून नंतर त्यांचे समर्थन व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे करण्यास प्रवृत्त करण्यासाठी खोटी भडकाऊ बातमी प्रकाशीत करून समाजात असंतोष व अप्रीतिची भावना भडकवून अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणान्या गुन्ह्याच्या करातील मुख्य आरोपी व दै. सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, आमदार उद्धव ठाकरे व इतर यांच्याविरुद्ध भादंवि 109, 353, 153-A, 505, 120(B), 34 अंतर्गत फौजदारी व इतर प्रतिबंधक कारवाई करन्यात यावी.
(२) आरोपी संजय राऊत, अनिल परब व इतर हे जामीनवर असतांना त्यांनी पुन्हा असे गंभीर गुन्हे केल्यामुळे त्यांचे आधीचे जामीन रद्द करून त्यांच्याविरुद्ध ईत्पर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकारी व सरकारी वकिलांना देन्यात यावी.
(३) आरोपींना कायद्याचा कोणताही आदर नसून नेहमी ते कायदा हातात घेण्याची भाषा व वापरून लोकांना (त्यांच्या कार्यकर्त्यांना) कायदा तोडण्यासाठी भडकावीत असल्याचे विविध पुरावे उपलब्ध असून अश्या लोकांना राजकीय पक्षाच्या पदावर राहण्यास व निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची याचिका निवडणूक आयोगापुढे दाखल करून योग्य ती कारवाई करन्यात यावी.”
तक्रारीची प्रत डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा;