[ब्रेकिंग] न्यायालयाकडून आदर पुणावाला व सिरम इन्स्टिट्यूटला दहा हजार कोटी रुपये नुकसान भरपाईच्या दाव्याची नोटीस.
कोविडशील्ड वॅक्सीनने होणारे मृत्यू लपवून सुरक्षित असल्याचा खोटा दावा करून अव्हेकन इंडिया मुव्हमेंटच्या सदस्यांची बदनामी केल्याप्रकरणी दै. देशोन्नतीचे संपादक श्री. प्रकाश पोहरे यांच्यामार्फत दावा दाखल.
कोविडशील्ड लस पूर्णत: सुरक्षित आहे त्यापासून मृत्यू होत नाही असा खोटा प्रचार करण्यापासून रोखणारा मनाई हुकूम का पारित करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस.
जीवघेण्या दुष्परिणामामुळे युरोपमधील 21 देशात कोविडशील्ड वर बंदी.
कोविडशील्ड वॅक्सीनच्या दुष्परिणामामुळे मृत्यू होत असल्याचे केंद्र सरकारच्या विशेष AEFI समितीच्या चौकशीत उघड.
दहा हजार कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी प्रकाश पोहरे यांनी तीन लाख रुपये कोर्ट फी न्यायालयात जमा केली आहे.
प्रकाश पोहरे यांच्यावतीने पूर्व न्यायाधीश ओंकार काकडे व इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. निलेश ओझा हे काम पाहत असून इंडियन लॉयर्स आणि हुमन राईट्स ऍक्टिव्हिस्टस असोसिएशनचे ५०० पेक्षा अधिक वकिलांनी त्यांच्या तर्फे अंतिम सुनावणी साठी हजार राहणार असल्याची माहिती दिली.
नागपूर : सिरम इन्स्टिट्यूट तर्फे बनविण्यात येणारी कोविडशील्ड लस ही सुरक्षित नसून त्याचे जीवघेणे दुष्परिणाम असल्याचे सिद्ध झाले असून 21 युरोपियन देशांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली होती.
सध्या लस घेतलेल्या लोकांमध्ये हृदयविकार, सांधे दुखणे मधुमेह, लकवा, कँसर, मानसिक रोग असे अनेक जीवघेणे व गंभीर दुष्परिणाम पाहायला मिळत असून त्यामुळे अनेक लोकांचे परिवार उद्ध्वस्त झाले आहेत.
तरीसुद्धा सिरम इन्स्टिट्यूट तर्फे काही भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोविडशील्ड लस पूर्णतः सुरक्षित आहे असा खोटा प्रचार करून लोकांना फसवणुकीने व दबाव आणून लसीकरण करण्याचे प्रयत्न झाले. या सर्व गैरकारभाराबाबत अव्हेकन इंडिया मुव्हमेंट व इंडियन बार असोसिएशन ने पर्दाफाश करून नागरिकांना सत्य परिस्थिती सांगून अनेकांचे व त्यांच्या मुलांचे, परिवारातील सदस्यांचे मृत्यू व इतर गंभीर दुष्परिणामापासून रक्षण करण्यास मदत केली.
त्यामुळे चिडून जाऊन सिरम इन्स्टिट्यूटने एक खोटी तक्रार पुणे पोलिसांना दिली होती. त्या तक्रारीत सिरम इन्स्टिट्यूट चे असे म्हणणे होते की त्यांची लस पूर्णता सुरक्षित आहे व अव्हेकन इंडिया मुव्हमेंट (AIM) खोटा प्रचार करीत आहे. परंतु ती तक्रार खोटी असल्यामुळे त्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही.
त्यानंतर अव्हेकन इंडिया मुव्हमेंटच्या देशभरातील सदस्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला त्यांच्याविरुद्ध नुकसान भरपाईसाठी केस दाखल करण्यासंबंधी एकूण तीन हजार नोटिसेस पाठविल्या.
अव्हेकन इंडिया मुव्हमेंटचे वरिष्ठ सदस्य व दैनिक देशोन्नतीचे एडिटर–इन–चीफ श्री. प्रकाश पोहरे यांनीसुद्धा दहा हजार कोटी रुपये नुकसान भरपाईची नोटीस पाठवली व त्यानंतर नागपूर येथील न्यायालयात दावा दाखल केला.
न्यायालयाने दिनांक 12.04.2023 रोजीच्या आदेशानुसार आदर पुणावाला, सिरम इन्स्टिट्यूट, श्री. विवेक प्रधान यांना नोटीसेस जारी केले आहेत.
सिरम इन्स्टिट्यूट व आदर पुणावाला यांच्याविरुद्ध अव्हेकन इंडिया मुव्हमेंटच्या सदस्यांकडून देशभरात चार लाख कोटींपेक्षा अधिक रुपयाच्या मानहानीच्या नुकसान भरपाई चे दावे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
प्रकाश पोहरे यांच्यावतीने पूर्व न्यायाधीश अॅड. ओंकार काकडे, इंडियन बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. निलेश ओझा हे काम पाहत असून इंडियन लॉयर्स अँड ह्यूमन राइट्स ऍक्टिव्हीस्ट असोसिएशनचे 500 पेक्षा जास्त वकील सदस्य प्रकाश पोरे यांच्या दाव्याच्या मुख्य सुनावणी वेळी उपस्थित राहतील अशी माहिती अॅड. तनवीर निजाम यांनी दिली.
कोर्ट ऑर्डरची प्रत डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा