STAY UPDATED WITH SC NEWS
इंडियन एक्सप्रेस समुहाच्या खाजगी कार्यक्रमात न्या. धनंजय चंद्रचूड यांनी हजेरी लावल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे त्या दोघांमधील पडद्यामागचे व्यवहार व ती खोटी व बदनामीकारक बातमी प्रकाशित करण्यामागचे कारण स्पष्ट झाल्याने दिली होती नोटीस.
सर्व प्रमुख वर्तमानपत्रात व न्यूज चॅनलवर इंडियन एक्सप्रेस ने माफीनामा प्रसिद्ध न केल्यामुळे व अब्रुनुकसानीचे ५००० कोटी रुपये न दिल्यामुळे इंडियन एक्सप्रेस ला नवीन नोटीस जारी करण्यात आली असून लवकरच मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा व फौजदारी व कोर्ट अवमानना ची याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. निलेश ओझा यांनी दिली.
सविस्तर बातमी वाचा:
मुर्सलीन शेख यांनी न्या. धनंजय चंद्रचूड यांना सरन्यायाधीश पदावर नियुक्त न करण्यासाठी व त्यांना शपथ घेण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका कोणतेही कारण न देता घाई घाईने नामंजूर केल्यामुळे श्री. शेख यांनी सर्वोच्च न्यायालयात पुर्नविलोकन याचिका दाखल केली.
परंतु इंडियन एक्सप्रेसने त्यांचा गैरहेतू साध्य करण्याकरीता श्री. शेख यांच्याविरुद्ध खोटी, एकतर्फी व बदनामीकारक बातमी प्रकाशीत केली.
न्या. धनंजय चंद्रचूड यांचे इंडियन एक्सप्रेस ग्रुप सोबत व्यक्तिगत हितसंबंध असून न्या. चंद्रचूड यांनी इंडियन एक्सप्रेस ग्रुप च्या खाजगी कार्यक्रमात हजेरी लावल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे ती बदनामीकारक बातमी प्रकाशित केली असून त्वरीत ती बातमी हटवून सर्व वर्तमानपत्रे व न्यूज चॅनलवर माफीनामा प्रसिद्ध करावा आणि नोटीस मिळाल्याच्या ७ दिवसात अब्रुनुकसानीचे ५००० कोटी रुपये डी.डी. द्वारे आणून द्यावेत अशी नोटीस श्री. शेख यांनी त्यांच्या वकिलामार्फत पाठविली. ती नोटीस मिळताच इंडियन एक्सप्रेस ग्रुप ने ती बातमी हटवून टाकली व झालेल्या त्रासाबदद्ल खेद व्यक्त करून यापुढे एकतर्फी बालमी छापली जाणार नाही व श्री. शेख यांचे वकिल किंवा प्रसीद्धी सचिव (Press Secretary) यांचे मत विचारूनच बातमी प्रकाशीत करव्यात येईल अशी लेखी हमी दिली आहे.