🟥 मास्क व सोशल डीस्टंगसींग चे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर व इतर लोकांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी तक्रार दाखल.
🟥 जनतेला मूर्ख समजनाऱ्यांना ‘जोर का झटका धीरे से’.
🟥 एकतर आरोपींविरुद्ध कारवाई करा किंवा आदेश बेकायदेशीर असल्याचे मान्य करून सामान्य जनतेला सुद्धा त्यांच्याच प्रमाणे निर्बंधातून सूट देवून आदेश परत घेण्याची मागणी.
मुंबई:-सामान्य जनतेला खोटी भीती दाखवून बेकायदेशीर नियम लावून त्यांचे जगणे कठीण करायचे आणि स्वतः मात्र राजेरोसपणे मास्क न घालता, सोशल डीस्टंगसींग चे पालन न करता विविध कार्यक्रम करत मजा मारणाऱ्या भ्रष्ट नेत्यांना सामाजिक संघटनांनी व जनतेने चांगलेच उघडे पाडले असून आरोपींविरुद्ध कारवाई करा अन्यथा आदेश बेकायदेशीर होते हे मान्य करून ते निर्बंध परत घ्या अशी तक्रार ‘अव्हेकन इंडिया मूव्हमेंट’ चे अंबर कोईरी यांनी दाखल केली आहे.त्या तक्रारीला जनतेचे व्यापक समर्थन मिळत आहे. खासदार संजय राऊत व इतरांविरुद्ध तसेच बेकयदेशीर नियम बनविण्याविरुद्ध सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे.
Very right step. Wholeheartedly support you in the fight of right and wrong.